संजय घोडावत समूहाच्या स्टार एअर विमान वाहतूक शाखेने भुज साठी नवी विमानसेवा सुरु केली आहे. उडाण योजने अंतर्गत १७ व्य ठिकाणासाठी ही सेवा सुरु करण्यात अली असून बेळगावहून भूजमधील १३ ठिकाणांसाठी नॉनस्टॉप विमान उड्डाण भरणार आहेत.
भुजसाठी सुरु झालेल्या सेवेनंतर बेळगाव शहर आता १३ नव्या ठिकाणांना जोडले जाणार आहे. १३ नॉनस्टॉप विमानसेवा, ३ एक स्टॉप आणि इतर सरासरीने १३४ विमाने ४ विमान वाहतूक कंपन्यांच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्यात उड्डाण करत आहेत.
भुज हे हातमागाच्या कामांसाठी ओळखले जाते. आजूबाजूच्या गावातील कलाकार त्यांच्या हाताने बनवलेल्या वस्तू भुजला विक्रीसाठी आणतात.अप्रतिम हस्तकला, भव्य राजवाडे, कच्छ प्रदेशातील पांढरे वाळवंट , आणि येथील कच्छ रण उत्सव अशा अनेक गोष्टींसाठी भुज प्रसिद्ध आहे.
स्टार एअरच्या उन्हाळी वेळापत्रकानुसार थेट जोडणारी १४५ जेट विमान सेवा भुज, अहमदाबाद आणि बेळगाव दरम्यान सुरु करणार आहे.

आठवड्यातील पाच वेळा भुज, अहमदाबाद आणि बेळगाव यादरम्यान विमान उड्डाण भरणार असून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे पाच दिवस ही सेवा सुरु राहील.
स्टार एअर ने ही सुविधा अत्यंत माफक दारात प्रवाशांसाठी उपलब्ध केली असून हा प्रवास आता विमानसेवेमुळे अवघ्या ६० मिनिटात पूर्ण करता येणार आहे.