रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी तब्बल 7 पदके पटकावित सुयश मिळविले आहे.
दिनांक 17 ते 20 जून 2022 दरम्यान रायपूर छत्तीसगढ येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील सुमारे 1900 स्केटिंग पटूंनी भाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवित एक सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कास्य पदके अशी एकंदर सात पदके पटकाविली.
स्पीड स्केटिंग प्रकारात श्रेया वाघेला हिने 1000 मीटर रिंक रेसमध्ये एक सुवर्ण, 500 मीटर रिंकरेस मध्ये एक कांस्य तर रोड रेस एक लॅपमध्ये एक कांस्य पदक पटकाविले.
प्रीती नवले हिने 100 मीटर रोड रेस मध्ये एक रौप्य आणि रोड रेस एक लॅपमध्ये सुद्धा एक रौप्यपदक मिळविले.
झियानाली तांबोळी याने 500 मीटर रिंग रेस मध्ये एक रौप्यपदक तर आराध्या मोरे हिने रोड रेस एक लॅपमध्ये कास्य पदक पटकावित सुयश मिळविले.
हे सर्व स्केटिंगपटू मागील 8 वर्षांपासून केएलई सोसायटी स्केटिंग रिंक, रोटरी कार्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्केटींग रिंक तसेच गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करतात.
या स्केटिंगपटूंना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, तसेच राज घाटगे, बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.