Monday, December 23, 2024

/

श्री पंतांच्या प्रतिमेचे ‘येथे’ झाले अनावरण

 belgaum

बेळगांव विमानतळाच्या मुख्य प्रतीक्षालय (एअरपोर्ट डिपार्चर लॉन्ज) येथे शहरातील चित्रकार शिरीष देशपांडे यांनी बॉलपेनने साकारलेली श्री पंतमहाराज बाळेकुंद्री यांची प्रतिमा व माहिती पोस्टरचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.

सदर सोहळ्यात बेळगांव विमानतळाचे मुख्य संचालक राजेशकुमार मौर्य, श्रीदत्त संस्थानचे विश्वस्थ डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, सौ. उज्वला, शिरीष देशपांडे आणि उद्योजक भरत देशपांडे यांच्या हस्ते श्री प्रतिमेचे अनावरण झाले. प्रतिमा पूजनानंतर सामूहिक आरती व प्रसादाचे वाटप झाले. Airport pant

यावेळी प्रकाश जोशी यांनी सर्वांना पंतसंप्रदायची माहिती कन्नड व हिंदी भाषेत करून दिली. दत्त संस्थानच्यावतीने डॉ. संजय पंत यांच्या हस्ते विमानतळाचे मुख्य संचालक राजेशकुमार मौर्य यांचा पंतप्रतीमा, शाल व श्रीफळ अर्पण करून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विमानतळावरील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, सुरक्षारक्षक, कस्टम विभाग अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्रीदत्त संस्थानचे सुधाकर खोत, प्रकाश जोशी, बाबासाहेब सुतार, अवधुत व वैभव सायनाक, राजू किल्लेकर इत्यादी मंडळी हजर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.