कंग्राळी बी.के. येथील सरकारी मराठी मुलामुलींच्या शाळेतील इयत्ता 7 वीच्या सन 1996 -97 सालच्या बॅचमधील माजी विद्यार्थी -विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा समर्थ मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला.
सदर स्नेह मेळाव्यास प्रमुख पाहुणे शाळेचे निवृत्त शिक्षक जी. आर. पाटील आणि सौ. तारले मॅडम यांच्यासह विरेश हिरेमठ, सैन्यातील जवान कपिल घाडी व जवान महेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी विद्यार्थी एचपी लिमिटेड बेंगळूरचे सॉफ्टवेर अभियंता प्रवीण भेकणे यांनी भूषविले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत माजी विद्यार्थी प्रा. रामभाऊ हुद्दार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय माजी विद्यार्थी डोलवीन लिमिटेड पुण्याचे व्यवस्थापक विनायक पाटील यांनी केले. यावेळी सौ तरळे मॅडम आणि जी. आर. पाटील यांनी यांची समयोचित भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात भेकणे यांनी शाळेचं बालपण आणि शाळेत आठणींना उजाळा दिला.
प्रमुख पाहुणे विरेश हिरेमठ यांनी आपल्या भाषणात शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व विषद करून त्याचा आपल्या जीवनात कसा वापर करावा याबद्दल विचार व्यक्त केले. चार्टर्ड अकाउंटंट सचिन चव्हाण, विनायक पाटील, शंकर अष्टेकर, विठाताई पवार, प्रभावती हुद्दार, गजाजन पाटील, सुनील पाटील, संभाजी मासेकर, भाऊराव पाटील, शंकर अष्टेकर, मारुती पाटील आदी माजी विद्यार्थ्यांचीही भाषणे झाली.
स्नेहमेळाव्यात मनोरंजन कार्यक्रम करून बालपणीच्या शाळेतील आठवणी ताज्या करण्यात आल्या. स्नेहभोजनाने मेळाव्याची सांगत झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक पाटील यानी तर आभार प्रदर्शन सुनील तारिहाळकर यांनी केले.