Tuesday, January 7, 2025

/

सार्वजनिक वाचनालयाचे आवाहन

 belgaum

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीदिनी दिनांक २६ जून २०२२ रोजी सण २०२१ – २२ या शैक्षणिक

वर्षाच्या मराठी माध्यमातील दहावी (एसएसएलसी) परीक्षेत बेळगाव शहर विभाग आणि बेळगाव तालुका या विभागात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी /

विद्यार्थिनीस प्रत्येकी रोख रुपये ५०००/- व प्रशस्तीपत्र तसेच सदर विभागातील प्रत्येक शाळेत सर्वप्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रुपये १०००/- व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

तरी सदर विभागातील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनींचे नाव शाळेच्या लेटर हेडवर सही, शिक्क्यानिशी दि. १९ जून २०२२ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात

सादर करावे, असे आवाहन संस्थचे अध्यक्ष नेताजी जाधव आणि मानद कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.