Sunday, November 24, 2024

/

सह्याद्री परिसरात आयएमईआरची शैक्षणिक सहल

 belgaum

बेळगाव शहरातील केएलएस आयएमईआरतर्फे संस्थेतील पहिल्या सेमिस्टरच्या मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी आयोजित सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरातील शैक्षणिक सहल अलीकडेच उत्साहात पार पडली.

केएलएस आयएमईआरतर्फे ‘अंडरस्टॅंडिंग मी’ अंतर्गत गेल्या 18 ते 20 मे या कालावधीत आयोजित या शैक्षणिक सहली अंतर्गत विद्यार्थ्यांना तीन दिवसांचे काटेकोर असे कठीण प्रशिक्षण दिले गेले.

प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या वागण्यातील बदल व कार्यक्षमता अभ्यासण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले. सहलीत मॅनेजमेंट पहिल्या सेमिस्टरच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता.Sahyadri

या सहलीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, सामाजिक आणि मानसिक विकास, सांघिक वातावरणात स्वतःला घडविणे तसेच नेतृत्व गुणांचा विकास साधण्यासाठी झाला. सहलीचे प्रमुख पी. जी. कोण्णूर यांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांची योजना आखली होती.

यावेळी सहकारी प्राध्यापक डॉ. अजय जमनानी विद्यार्थ्यांची विशेष कार्यशाळा घेतली. सहली दरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनीं समवेत श्रीमती सपना कुलकर्णी, सुषमा राऊत आणि जॉर्ज रोड्रिग्ज हा प्राध्यापकवर्ग देखील उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.