मराठा मंडळ संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयातील एमएससी आणि एमकॉम पीजी सेंटरची विद्यार्थिनी पल्लवी तिपन्ना शेडबाळ हिने राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथे एमएससीमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
बेळगावच्या इतिहासात या पद्धतीने चन्नम्मा विद्यापिठात एखाद्या विद्यार्थी विद्यार्थिनीने रँक मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पल्लवी शेडबाळ हिने रसायन शास्त्रामध्ये 79.5 टक्के गुण मिळविले आहेत. तिला आई-वडिलांचे आणि मराठा मंडळा संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्य प्रा. जी. वाय. बेन्नाळकर यांच्यासह प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.