विधान परिषद निवडणुकीत शिक्षक मतदारसंघात विजयी प्रमाणपत्र घेण्यास जाताना काँग्रेसच्या नेत्यांची जीभ घसरली असून विजेते उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली आहे.
निवडणूक जिंकलेल्या आवेशात असलेल्या हुक्केरी यांनी कायदा पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्या सोबत हुज्जत घालत तुझ्या तोंडातील दात तोडून टाकीन असा सज्जड दम भरला.
हुक्केरी यांनी मार्केट विभागाचे ए सी पी सदाशिव कट्टीमनी यांच्याशी हुज्जत घातली .निवडणूक विजेत्या प्रमाणपत्र स्वीकृत करण्यासाठी सतीश जारकीहोळी ए बी पाटील आदी नेत्यांसोबत ते मतमोजणी केंद्रात दाखल झाले त्यावेळी ए सी पी कट्टीमनी यांनी मतमोजणी केंद्रात सर्वांना प्रवेश दिला जाणार नाही असे म्हणत आडवे आले असता पोलिसांशी हुज्जत घालून मतमोजणी केंद्रात काँग्रेस नेत्यांनी प्रवेश केला होता.
सुरुवातीला ग्रामीण आमदारांनी पोलिसांशी वाद सुरू केला त्यावेळी प्रकाश हुक्केरी यांनी मध्ये तोंड घालत तोंडातील दात तोडून देईन असे सज्जड दम भरला.
निवडणूक जिंकल्याचा गुर्मीत आपले कर्तव्य पार पडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याना दम भरलेल्या घटनेची चर्चा मतमोजणी केंद्रात होती काँग्रेस नेत्यांनी पोलिसांना दिलेल्या वागणुकी बाबत सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जात आहे.कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिव्या देण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कुणी दिला असा प्रश्न विचारला जात आहे.
हुक्केरी यांनी 5 हजार हुन अधिक मतांनी वायव्य कर्नाटक शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला आहे .