झाडावरून पडून बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एकाला वेळीच इस्पितळात पोहचवून वन टच फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे.
एक हात मदतीचा…जुना गुडसशेड रोड बेळगाव येथील” वन टच फाऊंडेशन” या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील व त्यांचे सहकारी मित्र.हणमंत पाटील (निलजी ) हे दोघे माडीगुंजी फॉरेस्ट डेपो मध्ये लाकूड पाहण्यासाठी गेले होते.
त्या ठिकाणी जांभळीच्या झाडावरून विष्णु पवार नामक व्यक्ति जांभळे काढताना झाडाची फांदी तुटून सुमारे 20 फुट उंचीवरून खाली पडला होता व तो बेशुद्ध अवस्थेत होता.
बेशुद्धावस्थेत पडलेल्या इसमा शेजारी म्हातारी आई एकटीच कवटाळून रडत बसलेली होती त्यावेळी विठ्ठल पाटील आणि सहकाऱ्यांनी धाव घेत प्रथम त्याला शुद्धीत आणले, रुग्णवाहिकेची वाट न पाहता विठ्ठल पाटील यांनी स्वतःच्या गाडीतून खानापूर सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले.
आजच्या धकाधकीच्या, गडबडीच्या जीवनात स्वतःच काम सोडून जखमी अवस्थेतील इसमाला इस्पितळापर्यंत वेळेत पोचवल्याने, एक तर त्या जखमीस मदत मिळाली, वेळेत उपचार देखील मिळाले आहे. या कार्यामुळे वन टच फाऊंडेशनचे कौतुक होत आहेत.