गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारने जारी केलेल्या महत्वपूर्ण योजनांचा आढावा घेण्यासाठी व्यापार आणि औद्योगिक राज्यमंत्री सोम प्रकाश सोमवारी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा संवादाचा कार्यक्रम योजित केला असून ते या दौर्यात अधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध योजनांची माहिती घेणार आहेत.
बेळगाव येथील सुवर्ण शोध मधील सेंट्रल हॉलमध्ये सकाळी साडेदहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.
पंतप्रधान आवास योजना, उज्वल योजना, जल जीवन मिशन आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मुद्रा योजना,घोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत योजना,स्मार्ट सिटी योजना, एक देश एक रेशन कार्ड योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, गरीब कल्याण अन्न निधी योजना,आदी योजनांच्या विषयी ते आढावा घेणार आहेत.
मंगळवार 28 जून रोजी किल्ला येथील रेशन वितरण दुकानाला भेट ,बीम्स जनऔषधी केंद्राला भेट देणार आहेत. याशिवाय कडोली येथे नरेगा योजनेच्या माध्यमातून शाळेच्या केलेल्या विकास कामांची पाहणी देखील ते करणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री विशेषता केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहराला किती फायदा झाला आहे याचा आढावा घेणार आहेत त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण बेळगाव शहरांमध्ये गेल्या आठ वर्षांमध्ये स्मार्ट सिटी च्या माध्यमातून भरपूर निधी आला आहे त्याचं अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली आहे त्याची ते माहिती घेणार आहेत