विधान परिषदेच्या वायव्य कर्नाटक शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी बेळगावात मतदानाला सुरुवात झाली आहे. बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर यांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स अवलंब करण्यात आलेला आहे. या मतदान केंद्र केंद्रावर सोशल डिस्टन्स ने मतदान सुरू असून मार्किंग देखील करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच पर्यंत हे मतदान होणार आहे.
कर्नाटकातल्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात बेळगाव बागलकोट आणि विजापूर हे तीन जिल्हे येतात. शिक्षक मतदार संघात भाजपकडून अरुण शहापूर काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार बंनुर यांच्यात तिरंगी लढत आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून हनुमंत निराणी आणि काँग्रेसकडून सुनील संक हे उमेदवार आहेत आणि यांच्यातच दुरंगी लढत होत आहे.
बेळगाव जिल्ह्यात 95 बागलकोट जिल्ह्यात 48 आणि विजापूर जिल्ह्यामध्ये 47 अश्या 190 मत पेट्या तयार करण्यात आले आहेत. शिक्षक मतदार संघात 25388 तर पदवीधर मतदार संघात 99598 मतदार आहेत.
दरम्यान सकाळी विधान परिषद निवडणुकीचे निरीक्षक मेजर पी मन्नीवन्नन यांनी कित्तुर येथील मतदान केंद्राला भेट देऊन पहाणी केली.