तीन दिवसांच्या जागतिक गुंतवणूकदारांच्या मेळाव्याला येत्या 2 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होणार आहे तोपर्यंत अंतरिक्ष आणि संरक्षण (ए अँड डी) धोरण 2022 -27 तयार असणार आहे, अशी माहिती बृहत आणि मध्यम औद्योगिक मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली.
अंतरिक्ष आणि संरक्षण क्षेत्रात 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे.
त्याचप्रमाणे ए अँड डी पॉलिसी अर्थात धोरणांतर्गत अंतरिक्ष (एरोस्पेस) आणि संरक्षण (डिफेन्स) साहित्य निर्मितीसाठी कर्नाटक हे प्राधान्याने गुंतवणूक गंतव्य व्हावे हा देखील उद्देश आहे. कर्नाटक सरकार राज्यात बेंगलोर, बेळगाव, म्हैसूर, तुमकुर आणि चामराजनगर अशा 5 ठिकाणी एरोस्पेस अँड डिफेन्स हबची निर्मिती करणार आहे, अशी माहिती मंत्री निराणी यांनी दिली.
ए अँड डी पॉलिसी हे धोरण रस्ते, सक्षम ऊर्जानिर्मिती, पाणीपुरवठा आदी सर्वसमावेशक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे संशोधन आणि विकासाच्या सुविधा, सामान्य गोदाम, निर्मिती संकुल सुविधा,
सर्व उत्पादक कंपन्यांसाठी अंगभूत जागा या सारख्या प्लग अँड प्ले सुविधा, हब पार्कमध्ये आपले युनिट सुरू करणाऱ्या कंपन्यांना प्रतिभेचा मजबूत पुल उपलब्ध करून देण्यासाठी अंतरिक्ष आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम सरकारी आयटीआयमध्ये सुरू करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.