मच्छे येथे उभारण्यात येत असलेल्या निराधारांच्या वस्तीगृह केंद्राचे बांधकाम त्वरेने येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे, अशी सूचना कर्नाटक राज्य ग्रामीण मूलभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. जी. हिरेमठ यांनी केली.
मच्छे येथे उभारण्यात येत असलेल्या निराधारांच्या वस्तीगृह केंद्राच्या नूतन इमारतीच्या ठिकाणी आज सोमवारी सकाळी भेट देऊन कर्नाटक राज्य ग्रामीण मूलभूत सुविधा महामंडळाचे (केआरआयडीएल) व्यवस्थापकीय संचालक एम. जी. हिरेमठ यांनी तेथील कामाची पाहणी केली.
तसेच उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. अधिकारी आणि कंत्राटदाराला त्यांनी केंद्राचे बांधकाम येत्या दोन महिन्यात त्वरित पूर्ण झालेच पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी हिरेमठ यांच्या समवेत केआरआयडीएलचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते.