देशाबरोबरच कर्नाटक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने नवीन मार्ग सूची जाहीर केली आहे.सार्वजनिक ठिकाणांसह बस, रेल्वेमधून प्रवास करताना जनतेला मास्क घालणे बंधनकारक आहे. असे राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
मॉल,थिएटर, रेल्वे स्टेशन, मार्केट,बस स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक आहे.राज्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना या उपायांची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे.
केवळ मास्क परिधान केलेल्यांनाच शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट,कॅफेटेरिया,हॉटेल्स, शैक्षणिक संस्था, वस्तीगृह कार्यालय व बंदिस्त कारखान्यात प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली आहे. स्वतःच्या वाहनावरून आणि सार्वजनिक वाहनांमध्ये मास्क घालणे अनिवार्य आहे.
ताप सर्दी तसेच सदृश्य लक्षणे असलेले ज्येष्ठ नागरिक आणि इतर आरोग्य समस्या असलेल्या रुग्णांची प्राधान्याने चाचणी करावी तसेच निकाल उपलब्ध होईपर्यंत त्यांना घरी ठेवण्यात यावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.