यावर्षी बेळगाव वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीचा यात्रोत्सव 26 जुलै रोजी होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने मंगाई देवी गाऱ्हाणे कार्यक्रम तारीख 24 जून रोजी रात्री आठ वाजता मंदिरात पुजारी व मानकऱ्यांच्या वतीनं होणार आहे.
गाऱ्हाणे घातल्यानंतर सलग नऊ वार पाळण्यात येणार आहेत. दोन सोमवार, दोन शुक्रवार आणि पाच मंगळवार चा समावेश आहे. गाऱ्हाणे घातल्यानंतर यात्रा होईपर्यंत लग्नकार्य, मांसाहार व इतर कार्यक्रम देवीच्या परिसरात होणार नाहीत.
याची भाविकांनी नोंद घ्यावी. तसेच गार्हाण्यासाठी मंदिरात बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुजारी चव्हाण पाटील परिवाराने केले आहे.
नवसाला पावणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रेला प्रचंड गर्दी होत असते बेळगाव सह महाराष्ट्र गोव्यातून भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात.
कोरोना मुळे गेली दोन वर्षे यात्रा म्हणावी तेवढी मोठ्या प्रमाणात झाली नव्हती मात्र यावर्षी वडगांवची श्री मंगाई देवीची यात्रा गर्दीने मोठ्या उत्साहात होणार आहे.