Tuesday, November 19, 2024

/

जीवन विद्या मिशनतर्फे उद्या ‘यांचे’ व्याख्यान

 belgaum

सदगुरू श्री वामनराव पै यांच्या संकल्पाचा एक भाग म्हणून जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे उद्या शुक्रवार दि. 17 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर यांचा मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शहरातील कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंग मंदिरामध्ये सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश विनामूल्य आहे. 2022 -23 हे वर्ष सद्गुरू जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या अंतर्गत बेळगाव शाखेतर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या 2 तासाच्या व्याख्यानात भारतीय पोलिस दलातील आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर हे ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ या विषयावर मार्गदर्शनपर विचार व्यक्त करणार आहेत.

वैभव निंबाळकर हे भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक असून वयाच्या 22 व्या वर्षी भारतीय पोलिस सेवेत (आसाम केडर) त्यांची नियुक्ती झाली होती. आजवर आसाम मधील सहा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकपद त्यांनी सांभाळले आहे. पहिल्याच पोस्टिंगमध्ये एसडीपीओ बोकाखाट म्हणून सेवा करताना त्यांनी ओझीरंगा (आसाम) येथील एक शिंगी गेंडाच्या शिकारीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तस्कर आरोपींना अटक करण्याबरोबरच त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त केला होता. त्याबद्दल त्यांना खास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते. आजपर्यंत त्यांनी अनेक अमानुष गुन्हे, वन्यजीव तस्करी आणि दहशतवादी खटल्यांची यशस्वी फौजदारी चौकशी केली आहे. उल्फा, केपीएलटी, एनडीएफबी सारख्या अतिरेकी संघटना विरुद्ध दहशतवाद विरोधी कारवायांचे निंबाळकर यांनी नेतृत्व केले आहे. ‘कम्युनिटी पोलिसिंग’चे समर्थक असणाऱ्या वैभव निंबाळकर यांनी जादुटोणा, अंमली पदार्थ, व्यसनमुक्ती, सायबर क्राईम इत्यादी सामाजिक गुन्ह्यांबाबत जागृतीसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.Vaibhav nimbalkar

त्यांना डीजीपी आसाम यांच्याकडून सुवर्णपदक आणि मुख्यमंत्री आसाम यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीच्या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. याचप्रमाणे भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने 2022 मध्ये ‘पराक्रम पदक’ प्रदान करून त्यांना सन्मानित केले आहे.

गेल्या जुलै 2021 मध्ये झालेल्या आसाम -मिझोराम सीमा संघर्षांमध्ये पायाला गोळी लागली असल्याकारणाने सध्या वैभव निंबाळकर हे रजेवर आहेत. तेंव्हा या कर्तुत्वान पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाचा लाभ युवा पिढीसह सर्वांनी घ्यावा, असे आवाहन जीवंविद्या मिशन बेळगाव शाखेने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.