कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलातील प्रशिक्षणार्थी पोलिसाला प्रशिक्षणादरम्यान मानहानीकारक वागणूक दिल्याने संबंधित पोलिसाने आपल्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडून प्रतिक्रियेची मागणी केली आहे.
आपल्यावर पोलीसांनी मानहानीकारक हल्ला केला असून मला यासंदर्भात तुमची प्रतिक्रिया हवी आहे, अशी मागणी कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलामधील (केएसआरपी) विश्वा युएम या प्रशिक्षणार्थी पोलिसाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे ट्विटद्वारे केली आहे.
मला तुमची प्रतिक्रिया आवश्यक आहे.. बुटासह माझ्या कमरेत लाथ मारणे हा मोठा अपमान आहे… आणि त्याने माझ्या आत्मसन्मानाला मोठी ठेच बसली आहे… मी या संदर्भात पुढील पाऊल उचलण्यापूर्वी मला तुमची प्रतिक्रिया अत्यावश्यक आहे, असे विश्वा युएम या प्रशिक्षणार्थी पोलिसाने मुख्यमंत्र्यांना धाडलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
बेळगाव येथील ए पी एम सी कंग्राळी खुर्द नजीकच्या कर्नाटक राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी प्रशिक्षणादरम्यान उपरोक्त मारहाणीची घटना घडली आहे.त्यामुळे सोमवारी दिवसभर या घटनेची चर्चा जोरदार होती.