कारवार मधील कोकणी फलकांना कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे फासण्याचा प्रकार केला होता त्याविरोधात कारवार मधील कोकणी प्रेमींनी आवाज उठवत आंदोलन केले कन्नड संघटनावर कारवाईची मागणी केली आहे.
कालच बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथे कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्र शासनाचा दिशा दर्शक फलक बुलडोझर लाऊन हटवला होता त्या अगोदर दोन दिवसांपूर्वी कारवार मध्ये कन्नड वेदिकेने कोंकणी फलकाना काळे फासले होते कन्नड साठी कानडी संघटना आक्रमक झाल्या असताना दुसरीकडे कोंकणी प्रेमींनी देखील रस्त्यावर उतरून आवाज उठवला आहे.कारवार मधील कोंकणी फलकाना काळे फासल्याच्या निषेधार्थ येथील शेकडो कोंकणी प्रेमींनी मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला आहे.
कारवार मधील रस्त्यावर नगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकांवर कन्नडा सोबत कोकणी मध्ये त्या रस्त्यांची नाव देण्यात आली आहेत.14 जून रोजी कोकणी फलकाना कन्नड संघटनांनी काळे फासण्याचा निंद्य प्रकार केला आहे देवनागरी लिपीला मराठी भाषा समजून काळे फसलेल्या कन्नड वेदिका कार्यकर्त्यांवर कारवाई करा अशी कारवार अभिमानी बळग यांनी जिल्हाधिकाऱ्या कडे केली आहे.
कारवारचे मूळ निवासी कोंकणी भाषिक आहेत या कृत्याने भंडारी समाज आणि दैवज्ञ समाजाचा कोंकणी भाषिकांचा अपमान झाला आहे. कुणाच्याही त्यांच्या भांडणात न जाता कारवार कोकणी भाषेत गुण्यागोविंदानं नांदत आहेत अशा परिस्थितीत एकाएकी कन्नड रक्षण वेदिकेच्या कोकणी भाषेत करताना काळे फासल्याने या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आम्ही कोकणी भाषेचा अपमान सहन करणार नाही दोषींवर कारवाई करा अशी मागणी कोकणी प्रेमी किशोर नाईक यांनी केली आहे.
शेकडो कोकणी भाषी प्रेमिकांनी कारवार जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि नगरपालिकेच्या मोर्चा काढून निदर्शने केली यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
कारवार नगर पालिकेच्या वतीने कारवार शहरांमध्ये कोकणी आणि कन्नड भाषेत रस्त्यांचे नामफलक लावण्यात आलेले आहेत काळे फासलेले कोकणी फलक 15 दिवसांच्या आत पुन्हा बसवावे अन्यथा उग्र आंदोलन आणि कारवार बंद करू असा इशारा यावेळी आला.