बारावी अर्थात पीयूसी दुतीय वर्षाचा निकाल जाहीर झाला असून शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी बेंगळुरूमध्ये हा निकाल जाहीर केला आहे.यंदा बारावीच्या परीक्षेत 61.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बंगळुरू येथील पी यु सी बोर्ड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी यंदाच्या बारावीचा निकाल जाहीर केला गेल्या एप्रिलच्या 22 ते 18 मे मध्ये दरम्यान पियूसीच्या परीक्षा झाल्या होत्या राज्यभरातील 1076 केंद्रांमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल आज 18 जून रोजी घोषित करण्यात आला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांनी KAR12- स्पेस-नोंदणी संख्या टाइप करून 5626 ला SMS केल्यास मोबाईल फोनवर देखील उपलब्ध होणार आहे.
वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी पदवीपूर्व खात्याच्या वेबसाईटवर देखील विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे त्याचे लिंक कसे आहेत
http://www.karresults.nic.in
http://www.kseeb.kar. nic.in
http://www.pue.kar.in