Thursday, December 26, 2024

/

येळ्ळूरच्या समस्येसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मागणी

 belgaum

येळ्ळूर रोड वरील मुख्य रस्त्यावर गतिरोधक आणि सिग्नल फलक बसवा आणि येळ्ळूर बेळळारी नाल्याजवळील घाणीचे ढिगारे हटवा अशी मागणी येळ्ळूर ग्राम पंचायतीने केली आहे.

या समस्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर केले आहे.येळ्ळूर रोड मार्गे केवळ येळ्ळूर नव्हे तर खानापुर,गुंजी,नंदिहळळी,राजहंसगड,देसूर, सुळगा,या सगळ्या गावातील वाहन धारक बेळगावला ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करत असतात.

या रस्त्यावरून विटा वाळूचे ट्रक टेम्पो व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी प्रमुख बनला आहे. या रस्त्याला जवळपास येळ्ळूर मधील सहा शाळा ,हायस्कूल, अंगनवाड़ी आहेत. यामुळे सकाळ व संध्याकाळी शाळेच्या विद्यार्थ्यांची देखील या रस्त्यावर ये-जा असते अश्या वेळी दिशादर्शक फलक आणि सिग्नल फलकाचा अभावामुळे विद्यार्थ्याना जीव मुठित धरुन प्रवास करावा लागत आहे. तसेच रोज या रस्त्याला छोटे मोठे अपघात घडत आहेत. दखल घेत येळ्ळूर ग्राम पंचायतीने सदर मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंता पी. जी. टोटवी यांना निवेदनाद्वारे येळ्ळूरच्या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र हायस्कूल,चांगळेश्वरी हायस्कूल, अंगनवाड़ी क्रमांक 5, मराठी मॉडल स्कूल, प्राथमिक मराठी मॉडल स्कूल येळ्ळूरवाडी व कन्नड़ शाळा , शिवाजी विद्यालय या ठिकाणी गति रोधक बसवा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.Yellur gp

तसेच येळ्ळूर- बळळारी नाल्या पासून वड़गाव पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला ड्रीनेज व नाल्यातील घाण व मातीचे ढिगारे रस्त्या शेजारी टाकले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे आणि आरोग्यासाठी देखील सदर ढिगारे काढणे गरजेचे आहेअसेही ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या विषयाला अनुसरून 17 जानेवारीला देखील सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देण्यात आले होते मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही त्यासाठी पुन्हा एकदा अशी मागणी करून शासनाला आंदोलनाचा एक प्रकारे इशारा देण्यात आला आहे. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेनसे, अरविन्द पाटिल, शशिकांत धुळजी,कल्लापा मेलगे,पीडिओ अरुण नाइक,सेक्रेटरी सदानंद मराठे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.