मुडलगी गावच्या ओढ्याच्या काठावर प्लास्टिक बरण्यात सापडलेल्या त्या सहा पुरुष आणि एक गर्भकोषाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावले आहेत.
फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार सहा पुरुष आणि एक गर्भकोष असल्याने या प्रकरणात स्त्री भ्रूण हत्त्या नसल्याचे समोर आले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार, सहा भ्रूणांमध्ये गंभीर जन्मजात विकासात्मक विकृती आहेत. हे भ्रूण फॉर्मेलिन वापरून संग्रहालयात साठवलेल्या भ्रूणांसारखेच असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
तथापि, भ्रूण कसे गोळा केले गेले याचा सर्वसमावेशकपणे तपास करणे बाकी आहे. मात्र, ते बेकायदेशीर असल्याने याबाबत सर्वंकष चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हाभरातील 185 केंद्रांचा आढावा:
आरोग्य विभागाच्या पथकांनी शनिवारी जिल्हाभरातील 185 स्कॅनिंग केंद्रांना भेटी दिल्या. प्रत्येक केंद्रावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेतला जात आहे. प्रत्येक स्कॅनिंग सेंटर सरकारच्या सूचनांचे पालन होते की नाही?कागदपत्रे व्यवस्थित आहेत की नाही हा तपास करण्यात आला.
जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, बेळगाव 64, अथणी-24, सौन्दत्ती-8, रायबाग-8, चिकोडी-18, खानापूर-8, रामादुर्ग-6, गोकाक-40, बैलहोंगल-6 आणि हुक्केरी-3 केंद्रांची तपासणी करण्यात आली.