तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव येत्या शुक्रवार दि तीन जून 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील विविध फिडर वरून केला जाणारा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
शुक्रवारी टिळकवाडी, मारुती गल्ली, हिंदवाडी, जक्कीर होंडा, एस.व्ही. कॉलनी, पाटील गल्ली, बेळगाव शहर, एमईएस,
कॅम्प, नानावाडी, शहापुर आणि कपिलेश्वर फिडर येथून केला जाणारा वीज पुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
खंडित केला जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.