बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी गावातील ओढ्याजवळ उघड्यावर फेकण्यात आलेल्या त्या सात भ्रूणाचा अहवाल आला आहे.
काल शुक्रवारी प्लास्टिक बरण्यांमध्ये सापडलेले सातही भ्रूणं न्यायवैद्यक विज्ञान प्रयोग शाळेत (फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरी) पाठवण्यात आले होते त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा लागली होती.
फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये त्या सात भ्रूणापैकी सहा भ्रूण पुरुष जातीचे असून एक गर्भकोश आहे असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ महेश कोणो यांनी स्पष्ट केले आहे.
मुडलगी येथील वेंकटेश इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांचया हलगर्जीपणामुळे ही अर्भक उघड्यावर फेकण्यात आली होती त्यामुळे आरोग्य खात्यात एकच गोंधळ उडाला होता आरोग्य विभाग खडबडून जागे झाला होता.
जिल्हाधिकारी डॉ नितेश पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल जिल्ह्यातील सर्वच स्कॅनिंग सेंटर आणि क्लिनिकची तपासणी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बेळगाव शहर आणि तालुक्यातील अनेक स्कॅनिंग सेंटरची तपासणी झाली आहे तर मुडलगी येथील त्या इस्पितळाला टाळे ठोकण्यात आले आहे.