पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेला विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 28, पूर्वी रा. शास्त्रीनगर, सध्या रा. आनंदनगर -वडगाव) याच्यावर खुनी हल्ल्याचा 8 वा गुन्हा मार्केट पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. गोळी लागलेल्या त्याच्या पायावर बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली.
खुनांच्या विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला विशालसिंग याला मंगळवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. याचवेळी पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्याच्या पायावर गोळी झाडून त्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
विशालसिंग याच्यावर आतापर्यंत त्याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 7 खुनी हल्ले, एक खंडणी आणि मंडळी रोडवरील सुपारी देऊन करण्यात आलेल्या खूनाचा समावेश आहे.
वीरभद्रनगर येथे पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर देखील त्याने जीवघेणा हल्ला केला आहे. त्यामुळे मार्केट पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला असून तो आठवा गुन्हा आहे. त्यामुळे आता विशालसिंग चव्हाण याच्यावरील गुन्ह्यांची संख्या एकूण 10 झाली आहे.