हिंडलगा हुतात्मा स्मारकाच्या आवारात येत्या काळात हुतात्मा स्मारक भवन उभारण्यात येणार असून या भवनामध्ये नव्या पिढीला सीमाप्रश्नाचा लढा समजावा यासाठी भव्य स्मृती दालन उभारले जाणार आहे. या हुतात्मा स्मारक भवनासाठी दिवसेंदिवस देणग्यांचा ओघ वाढत असून या पद्धतीने लोकवर्गणीतून आत्तापर्यंत 13 लाख 84 हजार 133 रुपयांचा निधी जमा झाला आहे.
हुतात्मा स्मारक भवनाचा आराखडा व निधी संकलनाचे काम सुरू असून येत्या दोन वर्षात स्मृती दालनासह भवनाचे काम पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भवनाच्या उभारणीसाठी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणे 11 गुंठे जागा खरेदी करण्यात आली आहे.
याठिकाणी गेल्या आठवड्यात साफसफाई करून सपाटीकरण करण्यात आले आहे. हुतात्मा स्मारक भवनाची इमारत दुमजली असणार असून पहिल्या मजल्यावर स्लॅब व दुसऱ्या मजल्यावर पत्रे असणार आहेत. सीमा भागातील युवकांना सीमाप्रश्न म्हणजे काय? भाषावार प्रांत रचना कशी झाली? सीमा प्रश्नासाठी किती जणांनी हौतात्म्य पत्करले व सध्याची स्थिती काय आहे? याची माहिती या भवनातील दालनात उपलब्ध असणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे हुतात्मा स्मारक भवनाचे काम रखडले होते. मात्र सध्या कोरोना कमी झाल्यामुळे या कामाला गती देण्यात आली आहे. हिंडलगा हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आज झालेल्या अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी भवनाच्या उभारणीसाठी अनेकांनी उस्फुर्त देणग्या दिल्या. आतापर्यंत सदर भवनाच्या उभारणीसाठी देणगी स्वरूपात लोकवर्गणीतून एकूण 13 लाख 84 हजार 133 रुपयांचा निधी जमा झाला असून यापैकी कांही देणग्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
स्मारकाला सत्तर ते ऐंशी लाखाचा खर्च अपेक्षित आहे यासाठी तालुका समितीकडून समितीच्या कार्यकर्त्याकडून मित्रांकडून देणगी मिळत आहे.
कंत्राटदार आर. एम. चौगुले 5 लाख रुपये, डी. एम. चौगुले मण्णूर 1 लाख रु., रमाकांत कोंडुसकर 1 लाख रु., आंबेवाडी समिती शाखा 1 लाख रु., महाराष्ट्र एकीकरण समिती शाखा कुद्रेमनी 1 लाख रु., माणिक होणगेकर 1 लाख रु., आप्पाजी मुचंडीकर पिरनवाडी 51000 रु., मदन बामणे 51000 रु., मनोज पावशे 51000 रु., तानाजी पाटील 111117 रु., दिपक किल्लेकर चव्हाट गल्ली 11000 रु., अर्जुन हनुमंत जांबोटकर कुद्रेमनी 21000 रु., ईश्वर गुरव कुद्रेमनी 11000 रु., मारुती शंकर खन्नूकर 11000 रु., मल्लाप्पा निंगाप्पा पाटील कुद्रेमनी 11000 रु., गोपाळ देसाई खानापूर 5000 रु., एल. के. कालकुंद्री मण्णूर 11000 रु., डी. बी. पाटील फोटोग्राफर 11000 रु. मोतेश बारदेशकर 1005 रु., एल. आर. मासेकर 1000 रु., कृष्णा पाटील 5011 रु. महेश पाटील बेनकनहळ्ळी 11000 रु., शंकर चौगुले बेळगुंदी 10000 रु.