दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर त्यात भर म्हणून आता विविध न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जारी करण्यात आलेल्या सदर आदेशानुसार बेळगाव द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पवनेश डी. यांची प्रथम अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात बदली झाली आहे. तृतीय अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हरीश ए. यांची द्वितीय अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात न्यायाधीशपदी बदली झाली आहे.
पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अश्विन विजय श्रीयण्णावर यांची तृतीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश चनप्पागौडा यांची बदली पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशपदी करण्यात आली असून आठवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. कथ्यायनी यांची सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नववे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनंत एच. यांची आठवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीशपदी, दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गुरुराज शिरोर यांची नवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याचा आदेश बजावण्यात आला आहे. सदर बदली आदेश गेल्या शनिवारी बजावण्यात आला असून त्यावर कार्यवाही पुढील आठवड्यापासून होणार आहे.