येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कायद्यानुसार मराठी भाषेत कागदपत्रके मिळावीत या मागणीसाठी येत्या सोमवारी 27 रोजी इतर भाषेबरोबर मराठी कागदपत्रे देण्याच्या संदर्भात मुदत दिली होती ती मुदत संपली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रशासनाला जाग आणण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे.
या मोर्चामध्ये येळ्ळूर येथील सर्व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं अध्यक्ष शांताराम कुगजी,सचिव प्रकाश अष्टेकर, इतर सदस्यानी केले आहे.नुकताच येळ्ळूर समितीची बैठक झाली या बैठकीत सदर आवाहन करण्यात आले आहे.