खानापूर समितीच्या अध्यक्ष निवडीत मध्यवर्ती कोणताही हस्तक्षेप करणार नसून राजीनामा मंजूर करणे किंवा नूतन अध्यक्ष निवडणे याबाबत त्या घटक समितीने निर्णय घ्यावा आणि आम्हाला कळवा अशा सूचना मध्यवर्ती समितीने खानापूर समितीला दिल्या आहेत.
खानापूर घटक समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे पत्र खानापूर समितीचे गोपाळ देसाई यांनी मध्यवर्ती चे अध्यक्ष दीपक दळवी यांच्याकडे सुपुर्त केले त्यावेळी दळवी यांनी याबाबत खानापूर घटक समितीनेचं अध्यक्ष बाबतचा निर्णय घ्यावा आणि जर तुम्ही राजीनामा मंजूर करून तात्काळ दुसरा अध्यक्ष नियुक्त करा अशी भूमिका मांडली.
दरम्यान खानापूर घटक समितीच्या अध्यक्षा बाबत राजीनामा संघटनेचे सचिव गोपाळ देसाई यांच्याकडे दिला असल्याची माहिती देत देसाई यांनी त्याची प्रत दळवी यांच्याकडे सादर केली होती.
त्यावर खानापूरच्या संदर्भात मध्यवर्ती च्या बैठकीत चर्चा झाली आणि चर्चेअंती खानापूर घटना समितीने या बाबत निर्णय घ्यावा आणि तात्काळ दुसरा अध्यक्ष नियुक्त करावा अशा सूचना मध्यवर्ती समितीच्या नेत्यांनी दिल्या.
खानापूर तालुका समितीच्यावतीने मराठी परिपत्रकासाठी 27 जून रोजी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चा साठी जनजागृती करण्यासाठी निपाणी अथवा खानापूर येथे सभा घ्यावा अशी मागणी केली त्यावर सामूहिक पत्रक काढून जनजागृती करूया सभा बैठका घेऊन जनजागृती करण्याचे आश्वासन देण्यात आले.
मध्यवर्तीच्या सदस्यांनी खानापूर समितीच्या सदस्यांच्या कानपिचक्या करताना खानापुरात सभा बैठका घेत सक्रिय रित्या कार्य करा असा आदेश दिला आहे.बैठकीला खानापूर समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.