अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले बेळगाव शहरापासून विमानतळाची बस सेवा गुरुवार दोन जून पासून सुरू होणार आहे.रेल्वे स्थानकापासून शामराव विमानतळापर्यंत ही बस सेवा सुरू होणार असून जिल्हाधिकारी नितेश पाटील या बससेवे चे उद्घाटन करणार आहेत.
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन टू एअरपोर्ट खास बस सेवा सुरू होणार असून यासाठी विशेष बस देखील बनवण्यात आली आहे
रेल्वे स्टेशन पासून सदर बस धर्मवीर संभाजी चौक, राणी कित्तूर चन्नम्मा चौक, मध्यवर्ती बस स्थानक, संकम हॉटेल ते सांबरा विमानतळ असे या बसचे थांबे असणार आहेत.
विशेष करून सकाळी साडेआठ वाजता दिल्लीहून बेळगावला येणाऱ्या विमानाच्या वेळेला म्हणजे विशेष करून सकाळच्या सत्रामध्ये ही बस सुरू होणार आहे लवकरच या बसचे वेळापत्रक देखील जाहीर केले जाणार आहे.
सांबरा ते बेळगाव शहरापर्यंत बससेवा सुरू करा अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते सदर बस सेवा नसल्यामुळे अनेक प्रवाशांना विमानतळापासून सामना गावापर्यंत चालत यावे लागत होते पायपीट करावी लागत होती मात्र आता थेट विमानतळापासून बस सेवा सुरू असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना देखील होणार आहे.
सिटीझन कौन्सिलने बेळगाव रेल्वे स्टेशन पासून सांबरा विमानतळ पर्यंत ‘रेल कार’ सेवा सुरू करण्याची मागणी केली होती मात्र आता राज्य परिवहन महा मंडळाने रेल्वे स्टेशनच्या बस स्थानका पासून स्टेशन ते विमानतळ ही थेट बस सेवा सुरु केली आहे त्यामुळे रेल्वे बस स्थानक आणि विमानतळ ही तिन्ही ठिकाणे बेळगाव शहरात कनेक्ट झाली आहेत त्यामुळे प्रवाश्यांना याचा फायदा होणार असून खाजगी वाहनांवर अवलंबून रहावे लागणार नाही आहे.