उत्तर कर्नाटक या वेगळ्या राज्याची मागणी करणे ही ‘मूर्खपणाची गोष्ट आहे’ असे म्हणत विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनी उमेश कत्ती यांना टोला लगावत घरचा आहेर दिला आहे.यापूर्वी शिक्षण मंत्री राहिलेले बसवराज होरट्टी हे नुकताच जनता दलातून भाजपात आले आहेत त्यांनी विधान परिषद निवडणूक जिंकली होती
2024 निवडणुकीनंतर कर्नाटकात दोन राज्ये निर्माण होतील देशांत अशी 50 नवीन राज्यांची निर्मिती होणार आहे महाराष्ट्राचे तीन तर यु पी ची 5 राज्ये होतील असे वक्तव्य अन्न नागरी पुरवठा आणि वन मंत्री उमेश कत्ती यांनी केलं होतं.
या वक्तव्याचा अनेकांनी वेगळ्या पद्धतीने समाचार घेतला होता अनेक आणि उमेश किती यांच्यावर टीका केली होती आता नूतन विधानपरिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनी देखील यावरूनच उमेश कत्ती यांना ओला लावला आहे
कत्ती यांना भूतकाळातील कर्नाटक एकीकरणाच्या लढ्याची आठवण करून देण्याची गरज आहे. एकत्र कर्नाटक अबाधित राहिले पाहिजे. भाजपात कुणी याबाबत निषेध करत आहे हे की नाही माहीत नाही. मी भाजप पक्ष म्हणून सांगत आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले.
कर्नाटक एकीकरण संघर्षाने आज कर्नाटम अस्तित्वात आहे त्यामुळे एकीकरणाचा हेतू विसरणे ठीक नाही. उमेश कत्ती यांनी 2009 कर्नाटका वर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी वेगळ्या राज्याची मागणी पहिल्यांदा केली होती आणि आपणच मुख्यमंत्री होणार असं म्हटलं होतं याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
महाराष्ट्राचे तीन तुकडे?
कत्ती यांनी केलेल्या वक्तव्यात देशात पन्नास नवीन राज्य कर्नाटकात दोन महाराष्ट्रात तीन नवीन राज्ये होतील असे म्हटले होते. यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात विदर्भ ,मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र अशी तीन राज्य का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.