जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. 16 जानेवारी 2022 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता.
यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधवसह इतर दहा कार्यकर्त्यांच्यावर कॅम्प येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कॅम्प पोलीस स्थानकात धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पूजन केल्याबद्दल CRNO 05/ 2022/U/Section 4, 5 (1 ) 5,(3) 5(4) The karanatka Epidemic Disease Act 2020 हा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याच्या जामीनाकरिता पाचवे अडिशनल सिव्हिल कोर्टात शुक्रवारी जमीन मंजूर करण्यात आला.कोर्टाचे कामकाज वकील धनकुमार पाटील यांनी पाहिले तर बाळू बेनके यांनी जामिनासाठी प्रयत्न केले .