गोव्यातील कसीनो मध्ये आणि बेळगाव जवळील महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिनोळी येथे जगारात मध्ये पैसे हरलेल्या एका युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
जो घरामध्ये पैसे आल्याने नाराज होऊन बेळगाव जवळील बसवन कुडची येथील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
कलमेश्वर पांडुरंग बेडका वय 25 वर्षे राहणार शिवाजी गल्ली बसवन कुडची बेळगाव असे आत्महत्या केलेल्या या युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी माळ मारुती पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार जुगार खेळून या युवकाने कर्ज अंगावर केले होते तो कर्जबाजारी झाला होता गेले तीन दिवस तो बॅग घेऊन घराच्या बाहेर देखील गेला होता.
त्याने घराजवळच स्वतःला फाशी लावून घेत आत्महत्या केली आहे. जुगाराचे पैसे हरल्यामुळे तो नैराश्येत होता त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.