भारतात 3 मे रोजी ईद साजरी केली जाईल. सौदीमध्ये ईदचा चंद्र न दिसल्यानं तिथं आज ईद साजरी केली जाते आहे. त्याच्या बरोबर एक दिवस नंतर म्हणजेच उद्या मंगळवारी (3 मे) रोजी ईद साजरी केली जाईल. मरकजी चांद कमिटीकडून एक पत्रक जारी करत याबाबतमी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आज सोमवारी महिन्याचा शेवटचा रोजा करण्यात येईल.
दिवसाच्या सुरुवातीला सहेरी करुन आणि दिवस संपताना म्हणजेच सूर्यास्तानंतर इफ्तारी करुन उपवास सोडला जाईल. रविवारी खरंतर मुस्लिम बांधवांना चंद्रदर्शन होईल, अशी अपेक्षा होता. मात्र तसं झालं नाही. अखेर आता उद्या ईद साजरी (Ramadan eid 2022) केली जाईल.
बेळगाव आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आता मंगळवारी ईदचा उत्साह पाहायला पाहायला मिळेल. देशभरात 1 तारखेला चंद्रदर्शन होऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र न झाल्यानं आता संपूर्ण 3 मे रोजी ईद साजरी होईल.