Saturday, January 11, 2025

/

अचानक सुरू केली पोलिसांनी झाडाझडती

 belgaum

बेळगाव शहर आणि उपनगर परिसरात रहदारी पोलीसांची कारवाई नेहमीच पाहायला मिळत असते. मात्र आज गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी रहदारी पोलिसांनी अचानकपणे वाहनधारकांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे वाहनधारकांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

शहर उपनगरातील विविध प्रमुख चौक आणि रस्त्यांवर रहदारी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह ठिय्या मांडलेला दिसून आला.

रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून कागदपत्रे तपासण्यांचा त्यांनी सपाटाच लावला होता. त्याचबरोबर विना हेल्मेट, विना सीट बेल्ट तसेच रहदारी नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात अत्यंत तत्परतेने कारवाई केली जात होती.

एरवी कधीही न दिसणाऱ्या ठिकाणी आज रहदारी पोलीस अचानकपणे प्रकट झाल्यामुळे सुसाट वाहने हाकणारे आणि रहदारी नियम धाब्यावर बसवणार्‍या वाहनचालकांचे आज धाबे दणाणले. परिणामी त्यांच्या बेलगाम प्रवृत्तीला चांगलाच चाप बसल्याचे पहावयास मिळत होते.

दरम्यान रहदारी पोलिसांच्या कारवाईची वेळीच माहिती मिळालेले अनेक वाहनधारक आडमार्गाने आपल्या इच्छित स्थळी जाताना, तसेच पोलिस असलेल्या मार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांना सावध करताना दिसत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.