मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या उद्या बुधवारी काढण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची रीतसर निमंत्रण आज मंगळवारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले.
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुक उद्या बुधवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. नाथ पै चौक येथे मिरवणुकीचे उद्घाटन केले जाणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आज शहापूर महामंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना दिले. निमंत्रणाचा स्वीकार करून आपण अवश्य उपस्थित राहू असा आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. याप्रसंगी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सचिव गणेश दड्डीकर, नगरसेवक रवी साळुंखे, महेश जुवेकर आदी उपस्थित होते.
शहापूर येथील शिवजयंती मिरवणुकीचे निमंत्रण देण्याबरोबरच आज मंगळवारी रात्री वडगाव येथील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीसाठी देखील आज रात्री 8 वाजता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांना देण्यात आले.
बेळगावातील मुख्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक कशी असते याची थोडीफार पूर्वकल्पना यावी यासाठी वडगाव येथील चित्ररथ मिरवणूक आपण पहावी, अशी विनंती यावेळी पोलिस आयुक्तांना करण्यात आली. या निमंत्रणाचा देखील पोलीस आयुक्तांनी सुहास्यवदनाने स्वीकार केला.
शहापूर येथील उद्याच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. बॅरिस्टर नाथ पै चौक येथून प्रारंभ खडेबाजार शहापूर, एसपीएम रोड, रेल्वे ब्रिज मार्गे शनिमंदिर, स्टेशन रोड मार्गे सेंट मेरीज हायस्कूल, मारुती पुतळा तेथून धर्मवीर संभाजी चौक मार्गे मुख्य मिरवणुकीत सहभाग पुढे किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली मार्गे स्टेशन रोड, शनी मंदिर मार्गे रेल्वे ब्रिज, एसपीएम रोड मार्गे शहापूर येथे सांगता.