बेळगावच्या शहरात कायमचे चर्चेत असलेले ॲथलेटि धोंडीराम व सुरेश यांनी नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आजादी की अमृत महोत्सव यांच्या वतीने खेलो मास्टर असोसिएशन ॲथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच नाव मास्टर्स मध्ये कोरले आहे.
नुकत्याच दिल्ली येथे 30 एप्रिल पासून 3 मे पर्यंत मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धोंडीराम शिंदे (हिंडलगा) 75 वर्षावरील गटात 800 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम तर 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.त्याचबरोबर सुरेश देवरमनी( उचगाव) 70 वर्षावरील गटात 10 किलोमीटर धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक पाच किलोमीटर चलने प्रथम क्रमांक पाच किलोमीटर धावणे तिसरा क्रमांक 800 मीटर धावण्यात तिसरा क्रमांक 400 मीटर धावण्यात दुसरा क्रमांक कर्नाटका फुटबॉल संघ प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
बेळगावच्या महिला एथलिटची सुवर्णपदकाची कमाई
नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आजादी का अमृत महोत्सव यांच्या वतीने खेलो इंडिया मास्टर असोसिएशन ॲथलेटिक्स स्पर्धेचे बेळगावच्या महिला अथलिटने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
नुकत्याच दिल्ली येथे 30 एप्रिल पासून ते 3 मे पर्यंत मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बेळगावच्या कन्येने गरुड झेप घेत तीन सुवर्णपदकाची गवसणी घातली आहे.
शीतल हिने 400 मीटर मध्ये सुवर्णपदक 800 मीटर मध्ये सुवर्णपदक 1500 मीटर मध्ये सुवर्णपदक तर 4×100 रिले मध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. सध्या शितल ही संजय घोडावत कॉलेज कोल्हापूर येथे अथलेटिक्स कोच म्हणून कार्यरत आहेत.