Sunday, December 22, 2024

/

21 वर्षानंतर भेटले विद्यार्थी- शिक्षक

 belgaum

लहानपणीच्या शाळेतील आठवणी सगळे जण आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवतात तश्याच आठवणी सांबरा येथील विद्यार्थ्यांनी तब्बल 21 वर्षांनी जागे केल्या.निमित्त होतेसांबरा शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे

शिक्षकांनी केलेले संस्कार, चुकीच्या वेळी केलेली शिक्षा, वर्गातील गमतीजमती, परीक्षेचा तणाव, निकालाची उत्सुकता अशा अनेक आनंदी तर काही भावनिक आठवणींना उजाळा देत सांबरा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या 1994- 2001 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या आवारात उत्साहात पार पडला. तब्बल 21 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात एकमेकांशी संवाद साधला.

प्रारंभी पुष्यवृष्टी करून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सातवीच्या विद्यार्थीनिनी इशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.Sambra student

भैरू जत्राटी याने प्रस्ताविक केले. शिक्षिका व्ही. एम. तानुगोळ, एस. एल.किल्लेकर, जे. जि. माने, एम बी भोसले, एच वाय काजोलकर, गीता नाईक, अनिता पाटील, रेणुका लोहार, तुळसा पाटील, चिगरे टीचर, सीआरपी एस वाय कुरबर, शिक्षक बी वाय कोलकार, मेत्रे सर, मेनसे सर, एम बी चिंगळी, अशोक पगाद, विलास कंग्राळकर, एसडीएमसी अध्यक्ष महादेव अष्टेकर, उपाध्यक्षा सुमन गिरमल, पत्रकार यल्लाप्पा हरजी आदींचा शाल, श्रीफळ आणि फुलांची रोपे देवून गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना उपस्थित शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

भूषण जाधव, दीपा गिरमल, नागुली ओसाप्पाचे, पुष्पा गिरमल, नागेश गुरव यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी शाळेला प्रोजेक्टर भेट दिला. दुपारनंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत अनेकांनी सहभाग दर्शविला. ज्योती गिरी हिने सूत्रसंचालन तर कांचन जोगानी हिने आभार मानले.
यावेळी कृष्णा पाटील, वासू सोनजी, दीपक जोई, सागर मटार, शिवाजी जाधव, सुभाष शिरल्याचे, सागर जोगानी, पराग जोगानी, राजू गिरमल, महेश पाटील, श्रीधर चिंगळी, बसवंत चौगले, परशराम यड्डी, दत्ता कलखांबकर, बसवराज सुळेभावी, जोतिबा बेळगावकर, लक्ष्मण धर्मोजी, मारुती जोगानी, दीपक लोहार, नागेश गुरव, सुधा अप्पयाचे, ज्योती जोगानी, रेखा जाधव, भारता जोई, प्रभावती हणमाई, मंदाकिनी कलखांबकर, सावित्री चिंगळी, लक्ष्मी कोकितकर, गीता यड्डी, ज्योती जोई, कविता खनगावकर, जयश्री धारवाड, सुमन इरोजी, अर्चना पाटील, सारिका सुळेभावी, प्रेमा सुळेभावी, रूपा धर्मोजी, विमल पालकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.