मराठा जागृती निर्माण संघातर्फे बीई, डिप्लोमा, बीएससी व इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवार दि. 8 मे रोजी सकाळी 10:30 वाजता डॉ. प्रा. मंदाकिनी मुचंडी यांचे गणित विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
बीई, डिप्लोमा, बीएससी व इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील अडचण लक्षात घेऊन या मोफत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदवाडीतील घुमटमाळ मारुती मंदिर येथे हे व्याख्यान होणार असून विद्यार्थ्यांनी याचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
व्याख्यात्या डॉ. प्रा. मंदाकिनी मुचंडी यांनी कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथून गणित विषयात मास्टर्स डिग्री मिळविण्याबरोबरच गणितातील ग्राफ थेअरी हा विषय घेऊन मास्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी संपादन केली आहे.
या खेरीज राणी चन्नम्मा विद्यापीठातून त्यांनी जनरल टोपोलॉजी या विषयात पीएचडी पदवी मिळविली आहे. डॉ. प्रा. मंदाकिनी मुचंडी यांनी आतापर्यंत राज्यासह देश-विदेशातील अनेक चर्चासत्रे परिषदा आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतला आहे.