बेळगाव शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामकाजातील त्रुटी बेळगावकरांना तोंडपाठ झाल्या आहेत. शहरातील गजबजलेल्या राणी चन्नम्मा चौकात ट्रान्सफॉर्मर संदर्भातील आणखी एक चूक निदर्शनास आली असून या चुकीमुळे आणि अधिकारी तसेच कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे एखाद्याचा जीव गमवावा लागला तर नवल वाटू नये.
गजबजलेल्या अशा राणी चन्नम्मा चौकात असलेल्या ट्रान्सफॉर्मर मीटरचे दार कधीच तुटून पडले आहे. या बॉक्समध्ये असलेल्या वायर कनेक्शनला अनावधानाने कुणाचाही हात लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. कुणाचा जीवही जाऊ शकतो. सातत्याने वर्दळ आणि गर्दीचे ठिकाण असणाऱ्या या परिसरात झालेली ही चूक कोणाच्याही निदर्शनास आली नाही, याचेच आश्चर्य वाटते !
या परिसरात बस आणि रिक्षासाठी नेहमीच प्रवासी थांबलेले असतात. प्रवाशांबरोबर असलेली लहान मुले या परिसरात वावरत असतात. स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या या त्रुटीचा फटका कुणा निरपराध्याला बसू नये इतकीच माफक अपेक्षा!
Under smart city electrification work all the LED lamps not glowing bauxite road sahyadri belgaum pls give contact no