ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी मसाप बेळगावच्या तिसऱ्या साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन बोलताना सीमाभागातील मराठी साहित्यिकांचे विशेष कौतुक केले. बाबा पदमजी ते गुणवंत पाटील यांनी केलेल्या साहित्य सेवेचे कौतुक केले.
भाषेला कोणतीही सीमा नसते. भाषेसंदर्भात जे जे चांगले, ते स्वीकारले पाहिजे असे सांगत त्यांनी सत्याचा मार्ग स्वीकारणारे खरे साहित्य असते असे सांगितले.
गुणवंत पाटील यांच्या बाबतीत अनेक आठवणीना उजाळा दिला. महाराष्ट्रात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात उदघाटक झालेल्या चंद्रशेखर पाटील (चंपा) यांनी मी कन्नडमध्ये जन्मलो म्हणून मला कन्नडचा अभिमान आहे. मराठी ज्याची मातृभाषा आहे त्याला मराठीचा अभिमान असायला हवा यात गैर काही नाही असे उदगार साहित्य त्यांनी बेळगावचे साहित्यिक गुणवंत पाटील यांच्या उपस्थितीत काढल्याचे त्यांनी नमूद केले.
अनेक प्रकारचे साहित्य हाताळणारे गुणवंत पाटील हे बेळगावचे गुणवान, दर्जेदार साहित्यिक असल्याचे त्यांनी म्हटले.त्यांच्या अनेक वक्तव्याचे हवाले त्यांनी भाषणात गुणगौरव केला.
गुणवंत पाटील यांच्या बाबतीत बोलताना त्यांनी कर्नाटक मराठीचा पेपर सव्वाशे गुणांचा असून त्यांच बरोबर कर्नाटक सरकार मराठी पुस्तकांची खरेदी करून विविध सरकारी वाचनालयात वितरित करते ही महाराष्ट्र शासनाने दखल म्हणून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.