Thursday, January 2, 2025

/

निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत आरसीसी शिरोडा संघ अजिंक्य

 belgaum

होनगा येथील फिनिक्स रेसिडेन्शियल स्कूलच्या मैदानावर नुकत्याच आयोजित मुलांच्या निमंत्रितांच्या आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेतील 14 व 16 वर्षाखालील या दोन्ही गटाचे विजेतेपद आरसीसी शिरोडा गोवा या संघाने पटकाविले.

सदर निमंत्रितांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आरसीसी शिरोडा गोवा विजया क्रिकेट अकादमी आणि एमसीसी बेळगाव या संघांमध्ये साखळी पद्धतीने खेळविली गेली. त्यामध्ये 14 वर्षाखालील गटात शिरोडा गोवा संघाने 3 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला.

त्याचप्रमाणे 16 वर्षाखालील गटात शिरोडा गोवा संघाने 3 पैकी 3 ही सामने जिंकले. स्पर्धेतील 14 वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात आरसीसी शिरोडा संघाने प्रतिस्पर्धी विजया क्रिकेट अकादमीला पराभूत केले. त्याप्रमाणे 16 वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात एमसीसी संघाला प्रतिस्पर्धी आरसीसी शिरोडा संघाकडून पराभव पत्करावा लागला.Cricket

16 वर्षाखालील गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्वनेश (शिरोडा) व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विनीत लोटलीकर (शिरोडा) यांची तर 14 वर्षाखालील गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून विघ्नेश घाडी (शिरोडा) व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निश्चल (विजया अकादमी) यांची निवड करण्यात आली. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्काराचे मानकरी श्वनेश व मनिष हे ठरले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आयोजित स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे माजी रणजीपटू अनिल नाईक, गिरीश नाईक, अश्विन नाईक, प्राचार्या सर्फूनिशा सुभेदार, माजी प्राचार्या अलका पाटील, गौस हाजी, क्रिकेट प्रशिक्षक सूनील देसाई, रवी मालशेट आणि महांतेश गवी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.