मराठीचा लढा हा वाघाच्या डोळ्या सारखा आहे त्यात सावधपणा,धाक दाखवणारा आणि जरब असणारा आणि स्वाभिमानी आहे त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने या मराठीच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले.
सोमवारी सायंकाळी बेळगाव तालुक्यातील बाकनुर येथे 1 जून हुतात्मा दिन आणि मराठी परिपत्रकाच्या मागणीसाठी मोर्चात सहभागी झाल्यावर बोलत होते.
1 जून 1986 रोजी सीमा प्रश्नी कन्नड सक्ती विरोधात धारातीर्थी पडलेल्या नऊ हुतात्म्यांना अभिवादन करून मराठीच्या लढ्याचा पुन्हा एकदा एल्गार करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने बैठकांचा सपाटा लावला आहे.
1 जून रोजी सकाळी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक का मध्ये हुतात्म्यांना अभिवादन करून िल्हाधिकार्यांना मराठी कागदपत्र संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे याच्या जनजागृतीसाठी माजी आमदार मनोहर किणेकर आणि युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक आदी नेत्यांनी बेळगाव तालुक्यात गावोगावी जाऊन प्रचार सभा बैठका घेतल्या जात आहेत.
रविवारी मन्नूर गावात बैठक घेण्यात आली तर सोमवारी सायंकाळी बाकनुर बेळवट्टी आणि बेळगुंदी येथे बैठक घेऊन हुतात्मा दिनाला उपस्थित राहण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले.