अतिशय निष्ठेने पत्रकारितेचे व्रत हाती घेतल्याबद्दल तसेच समाजात कर्तुत्वाने यश साध्य करता येते हे दाखवून देत गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असल्याबद्दल अक्षता नाईक यांचा युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदर सन्मान सोहळा कोल्हापूर येथील नष्टे लॉन येथे आज दिमाखात पार पडला.यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मीडिया,वृत्तपत्र, छायाचित्रकार, सामाजिक शैक्षणिक औद्योगिक राजकीय राजकीय संस्था कला व क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कारकरण्यात आला.
अतिशय निष्ठेने पत्रकारितेचे व्रत हाती घेऊन समाजात कर्तुत्वाने यश साध्य करता येते. हे दाखवून देण्याचे काम अक्षता नाईकने केले आहे. आपल्या क्षेत्रात निष्ठेने प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्धपणे त्या काम करत आहेत. त्यांनी आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्व मुळे सर्वांशी मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आहेत. तसेच समाजाच्या उन्नतीसाठी त्या कार्य करत असल्याने त्यांची दखल युवा पत्रकार संघाने घेतली असून त्यांना युवा पत्रकार संघातर्फे सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन आज कोल्हापूर येथे गौरविण्यात आले.
अक्षता नाईक या आधी तरुण भारत सोशल मीडिया आणि वृत्तपत्रासाठी काम करत होत्या. तर आता बेळगाव केसरी न्यूज च्या प्रतिनिधी म्हूणन काम पाहत आहेत.त्या पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असल्याबद्दल त्यांचा युवा पत्रकार संघातर्फे पुरस्कार देण्यात आला आहे.
आज कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील सिनेअभिनेत्री पूजा जैस्वाल कोल्हापूरच्या आमदार जयश्री जाधव, नगरसेवक अशोकराव भंडारे नगरसेवक दिलीप पोवार कायदेशीर सल्लागार एडवोकेट, संदीप पवार नगरसेवक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील पत्रकार छायाचित्रकार आणि युवा पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार हितचिंतक आणि बेळगावकरांमधून कौतुक करण्यात येत आहे.