अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांपासून फारकत घेतलेले गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी अखेर आज बेळगाव भाजपच्या बैठकीमध्ये प्रकट झाले.
मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या कांही महिन्यांपासून बेळगाव शहरासह जिल्ह्यात होणाऱ्या कोणत्याही भाजप नेत्यांच्या कार्यक्रमाकडे न फिरकलेले आमदार रमेश जारकीहोळी आज मात्र बेळगावमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.
विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यापूर्वी आज बेळगावात भाजपची बैठक पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष नवीन कुमार कटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एका खाजगी हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या कांही महिन्यांपासून भाजपच्या कार्यक्रम आणि पासून फारकत घेतलेले आमदार रमेश जारकीहोळी आजच्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.
सदर बैठकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यातील अनेक मंत्री आणि आमदारांचा सहभाग होता.