सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील गुडसशेड रोड, गोडसे कॉलनी येथील वन टच फाऊंडेशन (एक हात मदतीचा) संस्थेच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त शहर आणि परिसरातील 20 गरजू कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य वितरित करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला.
वन टच फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, सदस्य अशोक चौगुले, वृषाली मोरे, धनश्री पाटील आणि देवयानी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं शहरातील सदाशिवनगर ,ज्योतीनगर, कामत गल्ली, शहापूर, कंग्राळी (बी.के.) व ऑटोनगर या येथील अतिशय गरीब गरजु अशा एकूण 20 कुटुंबांना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या जीवनावश्यक साहित्यामध्ये धान्य, साखर, चहा पावडर, तेल पाकीट, चना डाळ, तूरडाळ, मूग, वाटाणे, तिखट पाकीट, हळद पाकीट, बेसन पीठ, इत्यादी साहित्याचा समावेश आहे. या सामाजिक उपक्रमाप्रसंगी सेक्रेटरी मनोहर बुक्याळकर,
सदस्य टी.डी.पाटील, ज्योतेश हुरूडे, जयप्रकाश बेळगावकर, संतोष पाटील, शटूप्पा पाटील, रमेश सुतार, संतोष गंधवाले, माधुरी माळी, कल्पना सावगावकर आदी उपस्थित होते. उपरोक्त सर्व साहीत्य संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील आणि अशोक चौगुले यांनी दिलेले होते. वरील उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.