Monday, November 18, 2024

/

या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित -कटील

 belgaum

कर्नाटक राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय होईल. तसेच बेळगाव भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा विश्वास भाजपचे राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील भाजप उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी बेळगावला आले असता भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटिल पत्रकारांशी बोलत होते. राज्यात चार ठिकाणी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज सादर करण्यात येत असून वायव्य पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीप्रमाणेच धारवाड शिक्षक मतदार संघ आणि म्हैसूर येथील एका मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. या चारही ठिकाणी भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नवीनकुमार कटील यांनी व्यक्त केला. भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. हा राजकीय पक्ष असला तरी तो एका घराप्रमाणे आहे. प्रत्येक घरातील सदस्यांमध्ये कांही प्रमाणात मतभेद होतच असतात. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विचार मंथन करणे आणि एकसंध होऊन पक्षाचे कार्य पुढे सुरू ठेवणे आवश्यक आहे. भाजपमध्ये सध्या कोणतेही मतभेद नसून सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवीत आहेत आणि त्यामुळे दोन्ही जागांवर भाजपचा विजय होईल, असे कटीली म्हणाले.

प्रसारमाध्यमांनी महांतेश कवटगीमठ यांच्या पराभवाचे कारण विचारले असता कटील म्हणाले की, कांही फरकाने त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. निवडणूक म्हटली की असे प्रकार घडणे स्वाभाविक आहे. प्रत्येक निवडणुकीत आपणच विजय होऊ असे कांही नाही. काहीवेळा असे प्रकार होऊ शकतात. परंतु गटबाजी आणि मतभेदांमुळे हा पराभव झाला नसल्याचे भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी स्पष्ट केले.Mlc bjp

भाजपच्या निराणी, शहापूरकर यांचे अर्ज दाखल

भाजपचे अधिकृत उमेदवार हणमंत निराणी यांनी विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी तर अरुण शहापुरकर यांनी शिक्षक मतदार संघासाठी आज गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य पदवीधर मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाने हणमंत निराणी यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे शिक्षक मतदार संघातून अरुण शहापूरकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. या उभयतांनी आज शक्तिप्रदर्शन करत प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी अमलान आदित्य बिश्वास यांच्याकडे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवार हणमंत निराणी यांच्यासमवेत बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ आणि भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील उपस्थित होते. तसेच उमेदवार अरुण शहापुरकर यांच्यासमवेत माजी खासदार अमरसिंह पाटील व अन्य भाजप नेते हजर होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, भाजपच्या तुलनेत काँग्रेस पक्षानेही तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार असे जाणकारांचे मत आहे. विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी 13 जूनला मतदान होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.