Wednesday, November 27, 2024

/

मास्टर्स राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लबचे यश

 belgaum

बेंगलोर येथील पादुकोण द्रविड सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडिया मास्टर नॅशनल पॅन जलतरण स्पर्धेत *बेळगावच्या जलतरणपटूनी भरघोस यश मिळवले आहे.

या स्पर्धेत बेळगाव स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंनी एकूण 18 पदके पटकावली आहेत यात 12 सुवर्ण 5 रौप्य 1 कास्य पदक प्राप्त केले ही स्पर्धा 25 वर्षे ते 95 वर्षे वयोगटापासून 5 वर्षे (प्रत्येक गट) गटात वर्गीकृत केली जाते आणि वृद्ध वयोगटांमध्येही स्पर्धा घेतली जाते.

1. इंद्रजीत हलगेकर – 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदके
2. जगदीश गस्ती – 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदके
3. मीनल अंगोलकर पाटील – 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके
4. ज्योती होसट्टी – 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकेMasters swimming

भारतातील महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, गुजरात,कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांसारख्या भारतातील विविध राज्यांमधून सुमारे 500 जलतरणपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

वरील मास्टर्सचे जलतरणपटू जेएनएमसी (ऑलिम्पिक स्टँडर्ड) येथे पोहण्याचे धडे घेतात स्विमिंग कोच उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, नितीश कुडूचकर, अजिंक्य मेंडके, गोवर्धन काकतकर. यांसारख्या तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते. वरील सर्व जलतरणपटूंना डॉ. प्रभाकर कोरे जी, डॉ. विवेक सावोजी, लता कित्तूर अविनाश पोतदार, सौ.माकी कापडी, सौ.लता कित्तूर, सुधीर कुसणे मार्गदर्शन लाभत आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.