कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील राष्ट्रपिता महात्मागांधी सामाजिक संस्था व वाचनालयास विविध विधायक उपक्रमांसाठी राज्य मराठी विकास संस्था मुंबईकडून 60 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
कावळेवाडी राष्ट्रपिता महात्मागांधी सामाजिक संस्था व वाचनालयास यापूर्वी 36 हजार रुपयांचे अनुदान मिळत होते. त्यावेळी या अनुदानात उर्वरित 24 हजार रुपये जमा झाले आहेत. सदर अनुदान मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्यासह गावातील मोहनराव मोरे, नामदेव मोरे, सूरज कणबरकर, मनोहर मोरे, यशवंतराव मोरे, धाकलू ओऊळकर, कोमल गावडे, संतोष सुतार, रघुनाथ बाचीकर, दयानंद यळूरकर, कांचन सावंत, पृथ्वी जाधव, एम. पी. मोरे, नारायण प. मोरे, भाऊराव कणबरकर आदींनी समाधान व्यक्त केले. अनुदान मिळण्यासाठी मालोजीराव अष्टेकर आणि मुख्याध्यापक इंद्रजित मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात संस्थेची स्वतंत्र इमारत व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पी. आर. गावडे यांनी सांगितले.
अध्यक्ष वाय.पी.नाईक यांच्या मार्गदर्शनतून गेली चार वर्षे राष्ट्रपिता महात्मागांधी सामाजिक संस्था व वाचनालयातर्फे विविध उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबविले जात आहेत. कविसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा,वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विविध प्रकारची पुस्तकं अभिवाचन, रांगोळी व किल्ला स्पधाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी संस्था कार्यरत आहे.
याखेरीज हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. सीमाभागातील साहित्यिकांना एकत्र करून त्यांच्या कविता वाचनातून मराठीभाषा संवर्धन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरव पत्र देऊनगौरविण्यातआलेआहे.
निबंधस्पर्धा आयोजित करणे, स्वरचित काव्य लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन भावीपिढीला वैचारिक सक्षम करण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सीमाभागात ही संस्था उल्लेखनीय कार्य करीत आहे. यासाठीच मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या कावळेवाडीच्या राष्ट्रपिता महात्मागांधी सामाजिक संस्था व वाचनालयास महाराष्ट्रशासनाकडून अनुदान देण्यात आले आहे.