नागरी वसाहतीसह व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार राज्यात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कर्नाटक सरकारने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले असून सदर कालावधीत साऊंड सिस्टिम अथवा स्पीकर चालू ठेवावयाचे असल्यास संबंधित खात्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले आहे.
भल्या पहाटे मुस्लिम बांधवांकडून लाऊडस्पीकरवर पढले अजान आणि हनुमान चालीसा यासंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत लाऊडस्पीकर वापरावर बंदी घातली आहे.
हा निर्बंध बंदिस्त सभागृहातील सभा कार्यक्रमांसाठी लागू नसणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. जाहीरपणे खुल्या वातावरणात लाऊड स्पीकरचा वापर करावयाचा असेल तर त्यासाठी पंधरा दिवस आधी स्थानिक प्रशासनाकडून तशी परवानगी घ्यावी असे सरकारने सूचित केले आहे.