आपल्या अथवा एखाद्याच्या आधार कार्डची फोटो कॉपी जनतेने कोणत्याही संघटनेशी शेअर करू नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो, असा इशारा युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) या भारतीय नागरिकत्वाची पडताळणी करणाऱ्या प्राधिकरणाने दिला आहे.
आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर युआयडीएआयने ‘मास्क्ड आधार कार्ड’ची कन्सेप्ट सुरू केले आहे. जी नेहमीपेक्षा सुरक्षित आहे. मास्क्ड आधार हे देखील नियमित आधार कार्ड सारखे ओळखपत्र आहे. सुरक्षेच्यादृष्टीने मास्क्ड आधार कार्ड नियमित कार्डापेक्षा अधिक चांगले आहे . आपण पूर्ण आधार वर्ण (क्रमांक) दाखवू इच्छित नसाल तर अशा परिस्थितीत मास्क्ड आधार कार्ड उपयोगी येते. यामुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित होते. मास्क्ड आधार कार्ड म्हणजे ‘ई -आधार कार्ड’ होय. ज्यामध्ये बारा वर्णांऐवजी केवळ शेवटची चार वर्ण दिसतात.
मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी प्रथम युआयडीएआयच्या https://myaadhaar.uidai.gov.in. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तत्पूर्वी आपला मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला आहे याची खात्री करून घ्या. या वेबसाईटवर ‘माय आधार’ लिहिले असेल त्यावर क्लिक केल्यास डाउनलोड आधार टॅब येईल. त्यावर क्लिक केल्यास आधार, व्हर्च्युअल आयडी, एनरोलमेंट आयडी आय हॅव सिलेक्शन मध्ये दिसेल त्यानंतर सिलेक्ट युवर त्यानंतर सिलेक्ट युवर प्रिफरन्समध्ये जाऊन मास्क्ड आधार क्लिक करावे लागेल. आता या विभागात आपल्यास एनरोलमेंट आयडी, आधार क्रमांक, वर्चुअल आयडी पिनकोड आणि सुरक्षा कोड यासारखी माहिती विचारली जाईल. हे सर्व भरल्यानंतर युआयडीएआयच्या संबंधीचा संदेश येईल. येथे आपल्याला ‘आय ॲग्री’ वर क्लिक करावे लागेल आणि रिक्वेस्ट ओटीपी निवडावे लागेल.
यानंतर कन्फर्मवर क्लिक करा. जेणेकरून तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येऊ शकेल. आधार कार्डमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. मोबाईलवर आलेला सहा अंकी ओटीपी प्रविष्ट करा आणि एंटर बटन दाबा. यावेळी जलद सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण डाउनलोड आधार वर क्लिक करताच आपल्याला मास्क्ड आधार क्रमांक मिळेल. लक्षात ठेवा कि मास्क्ड आभार मिळविण्यासाठी आपला संकेतशब्द प्रविष्ट करावा लागेल. आठ वर्णांच्या मास्क्ड आधार संकेत शब्दासाठी आपल्या नावाची सुरुवातीची चार अक्षरे आणि आधार कार्ड मध्ये प्रविष्ट केलेले जन्मवर्ष प्रविष्ट केले जावे.
दरम्यान, आपले आधार कार्ड डाऊनलोड करून घेण्यासाठी नागरिकांनी इंटरनेट कॅफेमधील सार्वजनिक कॉम्प्युटर्सचा वापर करू नये असा इशारा सरकारने दिला आहे. जर आपण तसे करत असल्यास कृपया त्या कॉम्प्युटरमधील ई -आधार कार्डच्या डाऊनलोड केलेल्या सर्व प्रती कायमस्वरूपी नाहीशा होतील अर्थात डिलीट होतील याची खातरजमा करा, असा सरकारचा सल्ला आहे.